शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

अहमदनगरच्या पत्रकारितेच्या इतिहासातील एक आधुनिक बदल.

                   

                     एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना तंत्रज्ञानाने कमालीची प्रगती केली आहे. सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे आज प्रत्येक घराघरात संगणक, मोबाईल पोहचलेले आहे. आणि प्रत्येक जन इंटरनेट , सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून जगाशी कनेक्टेड राहणाच्या प्रयत्नात आहे. तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता बदलत चालली आहे. विस्तारत चालली आहे. सोशल मिडीयाच्या प्रसाराने पारंपारिक पत्रकारितेत बदल होत आहेत .या वेबसाइटचा अहमदनगर जिल्ह्यातिल तसेच पुणे, मुंबई व देश परदेशातील समस्त अहमदनगरकरांना फायदा होणार आहे. मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याला त्याच्या मातृभूमी विषयी वेगळीच ओढ असते. आपल्या गावात , आपल्या मातृभूमीत सद्ध्या काय चालू आहे , आपले मित्र , नातेवाईक, परिवार यांच्या विषयी उत्सुकता असते. म्हणूनच या वेब पोर्टलवर अहमदनगरमध्ये घडणारी छोट्यात छोटी बातमीही देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत,यासाठी प्रत्येक गावात आणि प्रभागात वार्ताहर / प्रतिनिधी नेमणूक केली असून सिटीझन जर्नलिझम च्या माध्यमातून जास्तीत जास्त स्थानिक बातम्या आणि माहिती आम्ही वेबसाईटच्या माध्यमातून जगभर पसरलेल्या अहमदनगरकारांपर्यंत पोहोचवीत आहोत .

              
                       www.ahmednagarlive24.com गेल्या सात-आठ महिन्यांपासून आमच्या जीवनाचा एक भाग, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याच कामकाज आम्ही सुरु केल, सुरवातीला फक्त अहमदनगरच्या बातम्या असणारी एक परिपूर्ण वेबसाईट बनवावी अस साधसुध धोरण होत, यासाठी बराच वेळ इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या शहरांच्या ,राज्यांच्या वेबसाईट पाहिल्या काही ऑनलाइन आणि Informative City न्यूज पोर्टल्स चा अभ्यास केला आणि एक-एक करत वेबसाईट ची हि संकल्पना वाढत गेली अहमदनगर हा तसा खूप नावाजलेला आणि राज्याच्या नकाशावर सर्वात मोठा जिल्हा या संपूर्ण जिल्ह्याची माहिती नेटवर खूप कमी प्रमाणात उपलब्ध होती, हे यावेळी प्रकर्षाने जाणून आले आणि आम्ही मी, सुरज व सुशील तिघांनी कामाला सुरवात केली. अहमदनगर जिल्ह्याविषयी जास्तीतजास्त माहिती कशी मिळेल याचा प्रयत्न केला, स्थानिक वर्तमानपत्रे ,संदर्भ पुस्तकातून तिघांनी गोळा करायला सुरवात केली एक एक गोष्ट यात जोडत गेलो आणि एक भव्य प्रोजेक्ट तयार झाला. आपली वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे यासाठी त्याअगोदरच आम्ही वेगेवेगळ्या माध्यमातून वेबसाईटची जाहिरात करू लागलो फेसबुक पेज, Whatsapp ग्रुप, पर्सनल ब्रोडकास्ट ,बल्क SMS च्या माध्यमातून प्रसार केला..लोकांचा प्रतिसाद जबरदस्त होता..माझ्या पर्सनल IB मध्ये अनेक जण म्हणायचे वेबसाईट अप्रतीम आहे , आजपर्यंत अहमदनगर चे न्यूज पोर्टल नव्हते तुम्ही बनवले खूप छान ...कदाचित हे आमच्या प्रयत्नाचेच फळ होते आजही वेबसाईट बद्दल लोकांच्या ह्याच प्रतिक्रिया आहेत आम्ही खर्या अर्थाने इथे यशस्वी होत आहोत .
              या वेब साईटवर ताज्या बातम्यांबरोबर फोटो, व व्हिडीओ, अहमदनगर चे नकाशे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे व ऐतिहासिक ठिकाणे याविषयी माहिती संकलित करून देत आहोत. राजकीय सदरामध्ये जिल्ह्यातील राजकीय पक्ष व त्यांचे पदाधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी विषयक माहिती असेल . शैक्षणिक या सदरामध्ये संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा-कॉलेजची माहिती व संपर्क, तसेच विद्यार्थी मित्रांसाठी महत्वाच्या टिप्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत , युवाविश्व हे पेज खास तरुणांसाठी बनवलेले आहे.या सदरात तरुणासाठी करिअर जॉब विषयक मोफत SMS अलर्ट सुविधा आहे. तसेच टेक्नॉलॉजी, फॅशन आदि संदर्भातही माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मनोरंजन या सदरामध्ये मनोरंजन विश्वातील घडामोडी, चित्रपट नाटक, परीक्षण आदि संदर्भातील लिखाण वाचकांना वाचायला मिळणार आहे. विविध या सदरामध्ये खास शेतकरी वर्गासाठी शेतीविषयक मार्गदर्शन विषयक लेख असणार आहेत, भविष्य, कथा, कविता, ग्राफिटी यांचा समावेश असेल. त्याच प्रमाणे अहमदनगरमध्ये जे लोक नवे आहेत वा पर्यटक म्हणून आले आहेत, त्यांना आवश्यक गोष्टी लवकरात लवकर मिळाव्यात म्हणून Local Search हे खास अॅप ठेवले आहे, कि ज्याच्या माध्यमातून अहमदनगर मध्ये नवीनअसणाऱ्या लोकांना केवळ एकाच क्लिक वर आपल्या परिसरातील हॉटेल, हॉस्पिटल, बँक, इमर्जन्सी, पोलिस व इतर आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती मिळेल व काहीच अडचण येणार नाही. तसेच व्यावसायिक आणि उद्योजक यांनाही स्वताचा व्यवसाय Local Search च्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आहे . उद्योजक / व्यावसायिक स्वताच्या व्यवसायाची माहिती असलेली वेबसाईट मोफत बनवू शकतील , तसेच अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी व व्यवसाय जास्तीत-जास्त लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी Customize Plans व Paid Listing हि यावर उपलब्ध आहेत .
          
खास सुटसुटीत रीस्पॉन्सीव्ह लेआऊट आणि युनिकोडचा वापर या वेबसाईटवर केला असून वेबसाईटमुळे मजकूर, चित्र, छायाचित्र, व्हिडिओ, ऑडिओ या सर्व माध्यमांतून बातमी अधिकाधिक नेमकेपणाने आणि अधिकाधिक वेगाने आपल्या वाचकापर्यंत पोहोचवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. हि वेबसाईट बनविताना एकच मुख्य उद्देश डोळ्यासमोर होता तो म्हणजे आपल्या वेबसाईटवर आलेला प्रत्येक व्हीझीटर हा वेबसाईटला भेट दिल्यानंतर समाधानी असला पाहिजे , कोणालाही कसलीही अडचण येऊ नये ....त्यामुळे हि वेबसाईट परिपूर्ण बनवण्यासाठी आम्ही जमेल तेवढे कष्ट केले आहेत परंतु तरीही अहमदनगर जिल्ह्याविषयी जर चुकून काही माहिती राहिली असेल तरती आम्हाला कळवण्याची तसदी घ्यावी. हि आमची अपेक्षा आहे. या वेबसाईटला अल्पावधीतच प्रतिसाद लाभत असून वेबसाईटवर येणाऱ्यांचे आभार मानावे ते कमीच आहे.
तेजस बा. शेलार- मुख्य कार्यकारी 
संपादक ahmednagarlive24.com
+91 9665762303 / 9665731979 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा