गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

अहमदनगर जिल्ह्यातील पहिले गावची उपयुक्त माहिती असणारे Smart App ' माय देवदैठण ' चे प्रकाशन संपन्न


                          संसद आदर्श ग्रामदत्तक योजनेत नव्याने समाविष्ट झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण गावची सर्व माहिती असलेले वेबसाईट (www.mydeodaithan.in) व Android App (My Deodaithan ) चे लोकार्पण केंद्रीय मंत्री मा.कालराजजी मिश्र , अहमदनगर दक्षिण चे खासदार दिलीप गांधी, माजीमंत्री बबनराव पाचपुते, ए.टी.एस मेट्रोमिडीया ग्रुपचे संस्थापक -संपादक तेजस शेलार , जि.प सदस्य अनिल वीर,पं.समिती सदस्य महेंद्र् वाखारे, प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .

            
तालुक्यातील पश्चिमेकडील टोकाला असनार्या व सात हजाराहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या देवदैठण गावाला तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत 'क' दर्जा प्राप्त असून संत निम्बराज महाराज,महर्षी दधीची ऋषी तसेच इतर अनेक देव - देवतांची जुनी देवालये असून विविध राजकीय,शैक्षणिक ,धार्मिक ,कार्यक्रमांची रेलचेल वर्षभर चालू असते ,गावाचा शैक्षणिक लौकिक,पाणी व्यवस्थापन ,क्षेत्रफळ व विविध विकास कामे या सर्व गोष्टींचा विचार करता सध्याच्या संगणकीय आणि धावत्या  युगात गावावीषयीची सर्व माहिती सर्वांना घरबसल्या मिळावी म्हणून  देवदैठण गावातील असणाऱ्या आणी सध्या नगर शहरात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तेजस शेलार,सुरज कोकाटे,सुनील निघुल व सुशीलकुमार शेळके आदि तरूणाच्या संकल्पनेतून हे app बनविण्यात आले आहे .     

अहमदनगर जिल्ह्यातील पहिले गावची उपयुक्त माहिती असणारे Smart App
या वेबसाईट मध्ये ग्रामपंचायतविषयी तक्रारी / सुचना गावकर्यांना घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात येतील अशी सुविधा आहे, मतदार यादी, तसेच सात – बारा उतारा या सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत .



"मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याला त्याच्या मातृभूमी विषयी वेगळीच ओढ असते. आपल्या गावात , आपल्या मातृभूमीत सद्ध्या काय चालू आहे , आपले मित्र , नातेवाईक, परिवार यांच्या विषयी उत्सुकता असते. जगभरात पसरलेल्या देवदैठण कराना या साईट आणि App मुळे गावाशी कनेक्टेड रहाता येणार आहे "
- तेजस बा. शेलार – वेबसाईट डिझायनर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा