मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

तेजस बा.शेलार याना आत्मनिर्धार फाउंडेशन तर्फे ‘युवा-उद्योजक’ पुरस्कार प्रदान

फेब्रुवारी २३, २०१६


                ए.टी.एस मेट्रो ग्रुपचे अध्यक्ष व अहमदनगर लाईव्ह24 व महाराष्ट्र लाईव्ह24 चे संस्थापक संपादक तेजस बा.शेलार याना नुकताच आत्मनिर्धार फाउंडेशन,निंबळक तर्फे ‘युवा-उद्योजक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . .
              तेजस शेलार वयाच्या सतराव्या वर्षांपासून पत्रकारितेत आणि वेबसाईट डिझाईनिंग, सोशल मिडिया मार्केटिंग, टेक्नोलॉजी आदी व्यवसायात कार्यरत असून अगदी लहान वयात पितृछत्र हरपल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतानाच शिक्षणाबरोबरच व्यवसायातही यशस्वी होणारे तेजस शेलार सध्या Ahmednagarwebs.com च्या माध्यमातूनअहमदनगर, नाशिक, पुणे, कल्याण, जळगाव व प.महाराष्ट्रात Website Designing & Development, Bulk SMS, Voice Calls, E-mails, Facebook, Whatsapp, Social Media Marketing, Brand Promotion, Election Campaigning, CMS, SEO, Logo, Media & Graphics Designing, E-Commerce, Android Apps Development, Customized Software Development, Events & Celebrity Management, Copyrights, Trademarks, ISO, Trust, NGO, Business Registrations, Consulting. आदि टेक्नोलॉजी,जनसंपर्क,जाहिरात व्यावसायीक कामात यशस्वीपणे कार्यरत आहेत .
            अहमदनगरलाईव्ह24.कॉम ही तेजस शेलार यांच्याच संकल्पेनेतून तयार करण्यात आलेली वेबसाईट असून अल्पावधीतच या वेबसाईटला ७५००० हून जास्त वाचकांच्या हिट्स भेटल्या असून अहमदनगर जिल्ह्याचे हे पहिले न्यूजपोर्टल अल्पावधीतच लोकप्रिय आणि वाचकांच्या पसंतीस उतरले आहे . २६ जानेवारी पासून अहमदनगरलाईव्ह च्या धर्तीवरच महाराष्ट्रलाइव्ह24 हे आणखी एक नवे न्यूजपोर्टल बनविण्यात आले आहे.

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

अहमदनगर जिल्ह्यातील पहिले गावची उपयुक्त माहिती असणारे Smart App ' माय देवदैठण ' चे प्रकाशन संपन्न

फेब्रुवारी ११, २०१६

                          संसद आदर्श ग्रामदत्तक योजनेत नव्याने समाविष्ट झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण गावची सर्व माहिती असलेले वेबसाईट (www.mydeodaithan.in) व Android App (My Deodaithan ) चे लोकार्पण केंद्रीय मंत्री मा.कालराजजी मिश्र , अहमदनगर दक्षिण चे खासदार दिलीप गांधी, माजीमंत्री बबनराव पाचपुते, ए.टी.एस मेट्रोमिडीया ग्रुपचे संस्थापक -संपादक तेजस शेलार , जि.प सदस्य अनिल वीर,पं.समिती सदस्य महेंद्र् वाखारे, प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .

            
तालुक्यातील पश्चिमेकडील टोकाला असनार्या व सात हजाराहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या देवदैठण गावाला तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत 'क' दर्जा प्राप्त असून संत निम्बराज महाराज,महर्षी दधीची ऋषी तसेच इतर अनेक देव - देवतांची जुनी देवालये असून विविध राजकीय,शैक्षणिक ,धार्मिक ,कार्यक्रमांची रेलचेल वर्षभर चालू असते ,गावाचा शैक्षणिक लौकिक,पाणी व्यवस्थापन ,क्षेत्रफळ व विविध विकास कामे या सर्व गोष्टींचा विचार करता सध्याच्या संगणकीय आणि धावत्या  युगात गावावीषयीची सर्व माहिती सर्वांना घरबसल्या मिळावी म्हणून  देवदैठण गावातील असणाऱ्या आणी सध्या नगर शहरात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तेजस शेलार,सुरज कोकाटे,सुनील निघुल व सुशीलकुमार शेळके आदि तरूणाच्या संकल्पनेतून हे app बनविण्यात आले आहे .     

अहमदनगर जिल्ह्यातील पहिले गावची उपयुक्त माहिती असणारे Smart App
या वेबसाईट मध्ये ग्रामपंचायतविषयी तक्रारी / सुचना गावकर्यांना घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात येतील अशी सुविधा आहे, मतदार यादी, तसेच सात – बारा उतारा या सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत .



"मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याला त्याच्या मातृभूमी विषयी वेगळीच ओढ असते. आपल्या गावात , आपल्या मातृभूमीत सद्ध्या काय चालू आहे , आपले मित्र , नातेवाईक, परिवार यांच्या विषयी उत्सुकता असते. जगभरात पसरलेल्या देवदैठण कराना या साईट आणि App मुळे गावाशी कनेक्टेड रहाता येणार आहे "
- तेजस बा. शेलार – वेबसाईट डिझायनर


शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

अहमदनगरच्या पत्रकारितेच्या इतिहासातील एक आधुनिक बदल.

जानेवारी २२, २०१६

                   

                     एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना तंत्रज्ञानाने कमालीची प्रगती केली आहे. सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे आज प्रत्येक घराघरात संगणक, मोबाईल पोहचलेले आहे. आणि प्रत्येक जन इंटरनेट , सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून जगाशी कनेक्टेड राहणाच्या प्रयत्नात आहे. तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता बदलत चालली आहे. विस्तारत चालली आहे. सोशल मिडीयाच्या प्रसाराने पारंपारिक पत्रकारितेत बदल होत आहेत .या वेबसाइटचा अहमदनगर जिल्ह्यातिल तसेच पुणे, मुंबई व देश परदेशातील समस्त अहमदनगरकरांना फायदा होणार आहे. मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याला त्याच्या मातृभूमी विषयी वेगळीच ओढ असते. आपल्या गावात , आपल्या मातृभूमीत सद्ध्या काय चालू आहे , आपले मित्र , नातेवाईक, परिवार यांच्या विषयी उत्सुकता असते. म्हणूनच या वेब पोर्टलवर अहमदनगरमध्ये घडणारी छोट्यात छोटी बातमीही देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत,यासाठी प्रत्येक गावात आणि प्रभागात वार्ताहर / प्रतिनिधी नेमणूक केली असून सिटीझन जर्नलिझम च्या माध्यमातून जास्तीत जास्त स्थानिक बातम्या आणि माहिती आम्ही वेबसाईटच्या माध्यमातून जगभर पसरलेल्या अहमदनगरकारांपर्यंत पोहोचवीत आहोत .

              
                       www.ahmednagarlive24.com गेल्या सात-आठ महिन्यांपासून आमच्या जीवनाचा एक भाग, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याच कामकाज आम्ही सुरु केल, सुरवातीला फक्त अहमदनगरच्या बातम्या असणारी एक परिपूर्ण वेबसाईट बनवावी अस साधसुध धोरण होत, यासाठी बराच वेळ इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या शहरांच्या ,राज्यांच्या वेबसाईट पाहिल्या काही ऑनलाइन आणि Informative City न्यूज पोर्टल्स चा अभ्यास केला आणि एक-एक करत वेबसाईट ची हि संकल्पना वाढत गेली अहमदनगर हा तसा खूप नावाजलेला आणि राज्याच्या नकाशावर सर्वात मोठा जिल्हा या संपूर्ण जिल्ह्याची माहिती नेटवर खूप कमी प्रमाणात उपलब्ध होती, हे यावेळी प्रकर्षाने जाणून आले आणि आम्ही मी, सुरज व सुशील तिघांनी कामाला सुरवात केली. अहमदनगर जिल्ह्याविषयी जास्तीतजास्त माहिती कशी मिळेल याचा प्रयत्न केला, स्थानिक वर्तमानपत्रे ,संदर्भ पुस्तकातून तिघांनी गोळा करायला सुरवात केली एक एक गोष्ट यात जोडत गेलो आणि एक भव्य प्रोजेक्ट तयार झाला. आपली वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे यासाठी त्याअगोदरच आम्ही वेगेवेगळ्या माध्यमातून वेबसाईटची जाहिरात करू लागलो फेसबुक पेज, Whatsapp ग्रुप, पर्सनल ब्रोडकास्ट ,बल्क SMS च्या माध्यमातून प्रसार केला..लोकांचा प्रतिसाद जबरदस्त होता..माझ्या पर्सनल IB मध्ये अनेक जण म्हणायचे वेबसाईट अप्रतीम आहे , आजपर्यंत अहमदनगर चे न्यूज पोर्टल नव्हते तुम्ही बनवले खूप छान ...कदाचित हे आमच्या प्रयत्नाचेच फळ होते आजही वेबसाईट बद्दल लोकांच्या ह्याच प्रतिक्रिया आहेत आम्ही खर्या अर्थाने इथे यशस्वी होत आहोत .
              या वेब साईटवर ताज्या बातम्यांबरोबर फोटो, व व्हिडीओ, अहमदनगर चे नकाशे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे व ऐतिहासिक ठिकाणे याविषयी माहिती संकलित करून देत आहोत. राजकीय सदरामध्ये जिल्ह्यातील राजकीय पक्ष व त्यांचे पदाधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी विषयक माहिती असेल . शैक्षणिक या सदरामध्ये संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा-कॉलेजची माहिती व संपर्क, तसेच विद्यार्थी मित्रांसाठी महत्वाच्या टिप्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत , युवाविश्व हे पेज खास तरुणांसाठी बनवलेले आहे.या सदरात तरुणासाठी करिअर जॉब विषयक मोफत SMS अलर्ट सुविधा आहे. तसेच टेक्नॉलॉजी, फॅशन आदि संदर्भातही माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मनोरंजन या सदरामध्ये मनोरंजन विश्वातील घडामोडी, चित्रपट नाटक, परीक्षण आदि संदर्भातील लिखाण वाचकांना वाचायला मिळणार आहे. विविध या सदरामध्ये खास शेतकरी वर्गासाठी शेतीविषयक मार्गदर्शन विषयक लेख असणार आहेत, भविष्य, कथा, कविता, ग्राफिटी यांचा समावेश असेल. त्याच प्रमाणे अहमदनगरमध्ये जे लोक नवे आहेत वा पर्यटक म्हणून आले आहेत, त्यांना आवश्यक गोष्टी लवकरात लवकर मिळाव्यात म्हणून Local Search हे खास अॅप ठेवले आहे, कि ज्याच्या माध्यमातून अहमदनगर मध्ये नवीनअसणाऱ्या लोकांना केवळ एकाच क्लिक वर आपल्या परिसरातील हॉटेल, हॉस्पिटल, बँक, इमर्जन्सी, पोलिस व इतर आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती मिळेल व काहीच अडचण येणार नाही. तसेच व्यावसायिक आणि उद्योजक यांनाही स्वताचा व्यवसाय Local Search च्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आहे . उद्योजक / व्यावसायिक स्वताच्या व्यवसायाची माहिती असलेली वेबसाईट मोफत बनवू शकतील , तसेच अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी व व्यवसाय जास्तीत-जास्त लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी Customize Plans व Paid Listing हि यावर उपलब्ध आहेत .
          
खास सुटसुटीत रीस्पॉन्सीव्ह लेआऊट आणि युनिकोडचा वापर या वेबसाईटवर केला असून वेबसाईटमुळे मजकूर, चित्र, छायाचित्र, व्हिडिओ, ऑडिओ या सर्व माध्यमांतून बातमी अधिकाधिक नेमकेपणाने आणि अधिकाधिक वेगाने आपल्या वाचकापर्यंत पोहोचवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. हि वेबसाईट बनविताना एकच मुख्य उद्देश डोळ्यासमोर होता तो म्हणजे आपल्या वेबसाईटवर आलेला प्रत्येक व्हीझीटर हा वेबसाईटला भेट दिल्यानंतर समाधानी असला पाहिजे , कोणालाही कसलीही अडचण येऊ नये ....त्यामुळे हि वेबसाईट परिपूर्ण बनवण्यासाठी आम्ही जमेल तेवढे कष्ट केले आहेत परंतु तरीही अहमदनगर जिल्ह्याविषयी जर चुकून काही माहिती राहिली असेल तरती आम्हाला कळवण्याची तसदी घ्यावी. हि आमची अपेक्षा आहे. या वेबसाईटला अल्पावधीतच प्रतिसाद लाभत असून वेबसाईटवर येणाऱ्यांचे आभार मानावे ते कमीच आहे.
तेजस बा. शेलार- मुख्य कार्यकारी 
संपादक ahmednagarlive24.com
+91 9665762303 / 9665731979 

मी तेजस बाळासाहेब शेलार

जानेवारी २२, २०१६

मी तेजस बाळासाहेब शेलार माझ्याविषयी माहिती हवीय ???
जरुर सांगतो सध्या तरी मी काही फारसा मोठा माणुस नाहीय.
भविष्यात नक्कीच असेल वयाने नाही पण कतृत्वाने !
प्रोफाईल पिक्चर मधला 'प्राणीमीच आहे !
आणि मी नसलो तर माझा आवडता आदर्श असेल.
सध्या काम व शिक्षणासाठी अहमदनगर शहरात रहातो
माझ जन्मगाव पुणे असून मुळगाव श्रीगोंदा तालुक्यात आहे  
-ahmednagarwebs.com ह्या नावाचा Fulltime बिझनेस चालु आहे,
-सध्या न्यू लॉं कॉलेज अहमदनगर येथे Parttime शिक्षण चालू आहे,
-ahmednagarlive24.com ह्या ऑनलाईन वेबपोर्टल द्वारे Fulltime पत्रकारिता चालू आहे ....
कविता करण्याची सवय आहे ,
-वैचारिक,आणि सामाजिक विनोदी भाषेत लिहण्याचा मला नाद आहे.. ( नाद खुळा)...
  कायम वाचत रहाणे हाच माझा श्वास आहे !
-शांत रहाणे आणि कमी बोलणे माझा छंद आहे !
पण याचा अर्थ मी अबोल किँवा लाजाळु आहे असा नाही !
मला कामाव्यतिरिक्त जास्त फालतु बोलायला आवडत नाही !
मला हसायला आवडत कारण हसणे हा माझा छंद आहे
आणि इतरांना हसवणे ही माझी सवय आहे
-माझे विचार थेट आणि एकदम सरळ असतात !
साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी हि माझी सवयच आहे!
मी एक नास्तिक मनुष्य आहे !
आणि मी कट्टर धर्म विरोधीक पण आहे-
-मी कोणतीही जात - धर्म मानत नाही
कारण माणुसकी हा माझा धर्म आहे,
आणि ईमानदारी माझी जात आहे !
-मी सत्यवादी माणूस आहे
खोटे बोलणे मला आवडत
नाही आणि खोटे बोलणारी माणसे माझे शत्रू आहेत!
-माझ्या आयुष्यात
Timepass नावाचा शब्द नाहीय .
इतरांहून वेगळ्या पद्धीतेने मलाजगायला आवडते!
मी रस्त्यावरुन चालणारा नसुन नवे मार्ग शोधणारा आहे!
-मला चारचौघांसारखे आयुष्य जगायला आवडत नाही 
माझी प्रत्येक गोष्ट ही ईतरांहून वेगळी असते
कारण मी असामान्य आहे !
माझ्या आयूष्यात सूख,दूखः या संकल्पना नाहीत !
-माझे जगणे हे मरणाच्याही पलिकडे गेलेले आहे ,
मी मरणाला घाबरत नाही आणि जगण्यापासूनही पळत नाही !
आयुष्यात आवडणारी आणि लागणारी
प्रत्येक गोष्ट सिरीअसली घ्यायची सवय लागलीय ...न जाणो याने
खुपदा नुकसानही होतंय पण ...सवय ती सवयच
वरील सर्व माहिती खरी आहे... खोटी वाटल्यास मला न समजून घेण्याची तुम्ही चुक केलेली आहे)i am sorry...
 माझे स्वप्न ...मला तेजस बाळासाहेब शेलार बनायचे आहे !!!! मला एक प्रसिद्ध  व्यक्तिमत्व व्हायचेय 
लेखन - पत्रकारितासामाजिक ,राजकीय ,क्षेत्रात काम करून नाव कमवायचं ....  
मी एक विचारवंत आहे
A) विचार आणि नुसता विचार करत असतो मी !
B) विचार करून करून माझे केसं कमी झाले आहेत.
C) जास्ती विचार केल्यामुळे मी एका वेळी एकाच मुद्यावर अनेक वैचारिक भूमिका घेऊ शकतो.
D) माझे विचार वादग्रस्त हि असू शकतात.
E)मी कोणत्याही राजकीय विचारसरणीस बांधील नाही.
F) नुसता विचार करत असल्यामुळे मी व्यवहारिक जगात रमणारा माणुस नाही
G) वैचारिक मतभेद मला मान्य आहेत. 
(व्यक्ती स्वतंत्र्याचा मी सर्वात मोठा पुरस्कर्ता आहे. आणि म्हणून मी शासन व्येवस्थेच्या विरुध्द आहे.)
H) शासन विरहीत समाज हा माझा अभ्यासाचा विषय आहे.
माझ्याविषयी अजुन खुप काही सांगता येऊ शकत पण नको आता उगाच तूमचे मी नक्की कोण आहे यावरून गैरसमज वाढायचे!!!!!
लास्ट ब्ट नॉट द लिस्ट
कामाव्यतिरिक्त उगाचच फालतु बोलन मला अजिबात आवडत नाही ,
...मला उगाचच एखाद्याचा अपेक्षाभंग करायला आवडत
नाही माझ्याशी खूप पर्सनली
बोललेलं मला आवडत नाही ...जेवला का ??काय
करतोस ?? असले फालतू प्रश्न मला आवडत नाही
...मी सोशलमिडीयावर केवळ मनोरंजन वैचारिक देवान घेवाण
आणि माझे सोशल मिडीयाताली इमेज
राहण्यासाठी येतो फालतू गप्पा मारण्यासाठी नव्हे ......
सर्व माहिति काळजी पुर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद

यात कधीही बदल होउ शकतो दि 23 AUG 2015